असं का होतं?
एखादी सुंदर कलाकृती पाहिली, छान गाणं ऐकलं कि आपण लगेच आपल्या भावना स्तुती रुपात व्यक्त करून मोकळे होतो. मनापासून दाद देतो.
पण.. जर एखादी सुंदर स्त्री दिसली तर...?
अशी दाद प्रामाणिकपणे आपण त्या व्यक्तिला का देवू शकत नाही? त्याकडे लगेच संशयाने का बघितलं जावं?
मी रोज अश्या कितीतरी सुंदर स्त्रिया बघतो.. काहींचं व्यक्तिमत्व एवढं प्रसन्न असतं कि ती प्रसन्नता आपल्याला भिडते. अशी सुंदरता टिकवणं, साजेसा पोशाख करणं हे सोपं नाही आहे. माझ्या मते ही पण एक अतिशय कष्टाने साध्य होणारी कलाच आहे.
त्यांना पाहून मला आनंद होतो, आजूबाजूच्या दगदगीचा एक क्षणभर का होईना विसर पडतो मग या बदल्यात मी कौतुकाचे चार शब्दपण बोलू नये?
आमच्या टीममधली एक मुलगी दिवाळीच्या दिवशी उत्कृष्ट भारतीय पोषाख करून आली. इथे अमेरिकेत दिवाळी वगैरे सण घरात, बाहेर तश्या वातावरणाचा मागमूस नसतो. पण त्या दिवशी तिच्यामुळे मी सणाचं ते वातावरण कंपनी मधे अनुभवलं. पण मी तिला complement
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment