Friday, November 9, 2007

मी हे नाव का निवडलं..

फिरस्ता :



तसं पाहिलं तर आपण सगळेच "भटके" किंवा "फिरस्ते" असतो.

या जगात येतो रिकाम्या हाताने आणि जातो रिकाम्या हाताने...


एका गावात, कोणाच्यातरी संसारात आपण प्रवेश करतो. काही काळ तिथे काढतो आणि एक दिवस अश्याच कोणाचा तरी संसार मोडून पुढच्या प्रवासाला निघून जातो. गावात नवीन येणारी माणसं अजून वेगळं काय करत असतात? ते जसे भटके, तसेच आपण नाही का?


..वरती मी म्हणालो खरं की रिकाम्या हाताने येतो आणि जातो. पण ते तेवढचं. आपल्याला एक मन पण असतं. जे विचार करतं, मिळालेले अनुभव साठवतं. ते मन आपण रिकामं कधी घेवून येत नाही आणि रिकाम घेवून जात नाही. त्यात नेहमीच भर पडत असते.



असेच आजवरच्या आयुष्यात मला आलेले अनुभव, मनात आलेले नवीन विचार किंवा मिळालेला नवीन दृष्टिकोन, शब्दांकित करण्याचा प्रयत्न करणार आहे.



साथ द्या, टिका करा, कौतूक करा. मला आवडेलच.

No comments: